• Recommended Posts

 • Browse By Category

 • Browse By Timeline

 • Advertisements

एक रात्री स्वप्नामध्ये…


एक रात्री स्वप्नामध्ये मी डॉक्टर झालो होतो.
अपरात्री एकटाच माझ्या दवाखान्यात आलो होतो.
कंपाउंडर गेला होता , मध्यरात्रीची होती वेळ.
पेंगत होतो खुर्चीत तेव्हा दरवाज्याची वाजली बेल.
सिद्धीविनायक स्वत: होता दरवाज्यात उभा खास.
“काहो बाप्पा इकडे कुठे, तुम्हाला कसला त्रास?”
“पाणी आण”, आत येत बाप्पांनी टिपला घाम.
खुर्चीवरती बसत म्हणाले “डोकं झालंय सॉलिड जाम”
“दीड हजार लोक काल दर्शनासाठी येउन गेले.
तऱ्हेतऱ्हेच्या मागण्या मांडून नारळ हार देउन गेले.
देव आहे विद्येचा मी, नारळाचा नाही रे.
दोन पुस्तके जास्त वाच, लायब्ररीत माझा आशिर्वाद घे.
आगगाडीत का दोन तास? रांगेत का सहा तास?
विद्येचीच जर नाही आस तर कशाला फुकटचा प्रवास?
गुरुविना धनुर्धारी, कुठे गेला एकलव्य?
मृत्युकडूनही द्न्यान घेइ नचिकेती बाणा दिव्य.”
म्हटले डोके शांत ठेवा तोंडाने घ्या हरिनाम.
दोन दिल्या ऍस्पिरिन आणि कपाळाला लावला बाम.
पंख्याखाली बसून घटका बाप्पा गेले राउळी.
मिनिटभरात पुन्हा बेल. दारात उभे छत्रपती.
वाघासारखा वाघ म्हणाला डोळ्यात दडवत पाणी.
“कोण्या पुस्तकात झाला अपमान माझा, भडकून उठले जवामर्द.
भर गर्दीत रिंकू पाटील जाळली तेव्हा सारे का झाले सर्द ?
कट्यार काढून शास्ता अफझल औरंग्याला भिडलो आम्ही.
हाच दिवस पाहण्यासाठी का ताना बाजी आले कामी?
गीता म्हणते धारातीर्थी पडणाऱ्यांना मिळतो स्वर्ग.
चाकू काढला गुंडाने तर का चड्डीत मुततो मध्यमवर्ग ?
पुस्तकात गोष्टी माझ्या, फोटो माझे घरोघरी.
पण आली कसोटी धैर्याची तर कोण कुठला शिवाजी.”
ब्लड प्रेशर वाढले होते डोळे झाले होते लाल.
घातली समजूत महाराजांची, गोळ्या दिल्या झोपेच्या चार.
पाठविले महाराजांना पण दवाखाना नव्हता रिता.
दवाखान्यात बसली होती झाशीची तेजस्विता.
म्हणाली “माझा पुतळा केला लोक आले चारपाच हजार.
त्याच दिवशीत रेल्वेगाडीत झाला एक बलात्कार.
चाळीस इतर अबला राहिल्या बघत न करता काही.
नराधमाच्या त्या नरडीचा घोट का घेतला नाही?
तान्हे पोर पाठीस घालून लढविली मी झाशी.
माझ्यापेक्षा त्यांची का संकटे मोठी होती?
अबला नव्हते कधीच, टाकून घोड्यावरती मांड,
बलाढ्य एका सत्तेला मी दिले होते आव्हान.

अबला नव्हते कधीच, भिडवून नजर नजरेला

“देत नाही झांशी जा” मी जबाब होता दिला.

अबला नव्हते कधीच , घेउन पट्टा आणि ढाल
तिप्पट मोठ्या सैन्यावर मी केली होती चाल,

अबला नव्हते कधीच एकदा सोडून बालेकिल्ला,

धडाडणाऱ्या तोफांवर मी केला होता हल्ला.

अबला नव्हते कधीच, माझ्या तलवारीचे पाणी
शतक लोटले, शत्रु माझे अजून विसरले नाही.
परवा मुघल, काल ब्रिटिश, आज दहशतवादी.
मुकाटपणे बसाल तोवर संकटांना तोटा नाही. ”
थातूरमातूर औषध देउन म्हटले घ्या विश्रांती.
गेली राणी घेउन गेली मनाची माझ्या शांती.
राणी गेली थोडा वेळ झाली सामसूम.
पण पाणी पिउन आलो तर भरली वेटिंग रूम.

पीनल कोड लिहून सारा आले होते आंबेडकर,

मार्सेलिसचा समुद्र पोहून आले होते सावरकर.

आत येते टिळक राहिले दार धरुनी खुले,

शिरली मशाल स्त्रीमुक्तीची सावित्रीबाइ फुले.

टागोर आले, बोस आले, आले होते हे सारे.
घेउन व्रत सत्याचे धैर्याने झुंजणारे.
मूड होता उदास आणि सारे झाले होते खिन्न.
चेहऱ्यांवरती वेदना त्यांच्या डोळ्यात होते प्रश्नचिन्ह.
प्रश्न होते अनेक सारे उत्तर होते एकच खास.
विश्वास आमचा देवांवर पण स्वत:वरच नाही विश्वास.
देव परंतु मर्म जोखतो,
देव परंतु कर्म जोखतो.
भगीरथाच्या यत्नामध्ये
देव परंतु धर्म जोखतो.
धीरधरांची पाठ शेकतो,
दानशूरांचे पाय चेपतो.
त्यातून उरला वेळ कधी तर
भक्तिकऱ्याचे भजन ऐकतो.

– केदार सोमण

Advertisements

4 Responses

 1. Its so true. The idea, the words are really touching.

 2. Hi Kedar,
  the idea is really touching. I was surprised to know this quality of yours. The flow of the wordings is well balanced and easy to penitrate.
  Good one!!

  Geeta

 3. Hi Kder,

  Pl continue writing the same way.As creative artist may not have any idea of his work but for others it is a valueable masterpiece work

 4. Hi Keda,
  khooppppppppppp chan kavita aahe. kripa karun he savay sodu nakos

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: